Menu

स्तोत्रसंहिता 121

CBI

1 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो— मला साहाय्य कुठून येईल? 2 स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह, तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत. 3 ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही. 4 खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत. 5 याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात— याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत. 6 दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही, आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही. 7 याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील— आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील. 8 तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे, यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate