Menu

स्तोत्रसंहिता 120

CBI

1 संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली. 2 हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा. 3 अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल? 4 ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील. 5 धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला! 6 जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे. 7 मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate