Menu

स्तोत्रसंहिता 122

CBI

1 मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ." 2 अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे. 3 यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे, जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी. 4 हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत. 5 इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे. 6 यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो. 7 तुझ्या तटांच्या आत शांती नांदो; तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो. 8 जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो, “तुझ्यामध्ये शांती नांदो." 9 आपले परमेश्वर याहवेह, यांच्या मंदिराप्रीत्यर्थ, तुझा उत्कर्ष व्हावा, अशी अभिलाषा करेन.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate