Menu

स्तोत्रसंहिता 137

CBI

1 आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो. 2 आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या, 3 कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!" 4 या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे? 5 हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो; 6 जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. 7 हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका." 8 अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल. 9 जो तुझी तान्ही बालके घेऊन, त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate