Menu

स्तोत्रसंहिता 133

CBI

1 ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात, 2 ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या, झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे. 3 हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate