Menu

स्तोत्रसंहिता 70

CBI

1 हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या. 2 माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत. 3 जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात, ते लज्जित होऊन माघारी फिरोत. 4 परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!" 5 परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate