Menu

स्तोत्रसंहिता 6

CBI

1 याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका. 2 मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत. 3 माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार? 4 याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा. 5 मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार? 6 माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो. 7 दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे. 8 दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे. 9 याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील. 10 माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate