Menu

स्तोत्रसंहिता 24

CBI

1 पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत. 2 कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले. 3 याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील? 4 ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही. 5 त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल. 6 हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला 7 अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा; गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या. 8 असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत. 9 अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, सताड उघडा; महातेजस्वी महाराज आत येतील. 10 हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate