Menu

स्तोत्रसंहिता 150

CBI

1 याहवेहचे स्तवन करा. त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा; त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा; 2 त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा; 3 कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा; सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा; 4 डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा. 5 खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा. 6 प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate