Menu

स्तोत्रसंहिता 142

CBI

1 मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो. 2 माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे. 3 कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत. 4 ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही. 5 मी याहवेहचा धावा करतो; मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात, जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात." 6 माझा धावा ऐका, कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा, कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत. 7 मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate