Menu

स्तोत्रसंहिता 14

CBI

1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही. 2 मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात. 3 प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही. 4 दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत. 5 पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत, कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत. 6 दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात. 7 अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate