Menu

स्तोत्रसंहिता 130

CBI

1 याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे; 2 माझा धावा ऐका; प्रभू, माझ्या कृपेच्या विनंतीकडे तुमचे कान लागोत. 3 याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील? 4 पण तुम्ही क्षमाशील आहात; म्हणूनच आम्ही अत्यंत आदराने तुमची सेवा करू शकतो. 5 मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे. 6 पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो. 7 हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे. 8 ते स्वतः खंडणी भरून इस्राएलला सर्व पापांपासून मुक्त करतील.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate