Menu

स्तोत्रसंहिता 128

CBI

1 जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य! 2 तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल. 3 तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील. 4 होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार. 5 याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील. 6 नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate