Menu

स्तोत्रसंहिता 126

CBI

1 जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले , तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले. 2 आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत." 3 याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत. 4 हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या . 5 जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील. 6 जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate