Menu

स्तोत्रसंहिता 124

CBI

1 सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते, 2 जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते, 3 तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता. तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते; 4 जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो व जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो, 5 उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला गिळंकृत केले असते. 6 याहवेह धन्यवादित असोत; त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही. 7 पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा, त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो; पाश तुटलेला आहे आणि आम्ही मुक्त झालो आहोत. 8 आमच्या साहाय्याचा उगम, स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate