Menu

स्तोत्रसंहिता 113

CBI

1 याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा. 2 याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ. 3 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो. 4 याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत; त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे. 5 आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे, जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात, 6 जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात? 7 ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; 8 ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात. 9 ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात, आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात. याहवेहचे स्तवन करा.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate