Menu

स्तोत्रसंहिता 11

CBI

1 मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा," 2 कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी. 3 जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार? 4 परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते; पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात. 5 याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात. 6 जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्‍याने त्यांना होरपळून टाकतील. 7 कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate