Menu

स्तोत्रसंहिता 1

CBI

1 धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत. 2 पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो. 3 ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते. 4 परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुश्यासारखे आहेत. 5 म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत. 6 कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate