Menu

यिर्मयाह 45

CBI

1 यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला: 2 “हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत: 3 तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’ 4 परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन. 5 मग तू स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवू पाहतोस काय? तसे करू नकोस, कारण या सर्व लोकांवर मी महान विपत्ती आणणार असलो, तरी मात्र तू जिथे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवेन,’ असे याहवेह जाहीर करतात."

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate