Menu

मत्तय 12

TWF

1 त्या येळले येशु शब्बाथ दिनले शेतमाईन गया; तवय त्याना शिष्यसले भूक लागेल व्हती म्हणीन त्या ओंब्या तोडीन खाऊ लागनात.

2 हाई दखीसन परूशी त्यासले बोलनात, दखा, शब्बाथ दिनले जे योग्य नही ते तुना शिष्य करी राहिनात.

3 त्यावर येशुनी त्यासले उत्तर दिधं, दावीद अनं त्यानाबरोबरना यासले जवय भूक लागनी तवय त्यानी काय करं? हाई तुम्हीन वाचं नही का.

4 तो देवना मंदिरमा कसा गया अनी नियमाप्रमाणं फक्त याजकनी खावानी समर्पित भाकर, त्यानी अनं त्याना सोबतीसनी कश खादं;

5 तसच शब्बाथ दिनले याजक मंदिरमा शब्बाथना नियम तोडतस तरी पण निर्दोष राहतस हाई तुम्हीन मोशेना नियमशास्त्रमा वाचात नही का?

6 पण मी तुमले सांगस, की, मंदिरपेक्षा बी मोठा असा कोणतरी तुमनामा आठे शे.

7 जर तुमले याना अर्थ समजता, की, माले दया पाहिजे अर्पण नही, तर तुम्हीन निर्दोषीसले दोषी नही ठरावतात.

8 कारण मनुष्यना पोऱ्या शब्बाथ दिनना धनी शे.

9 मंग येशु तठेन निंघीसन त्यासना सभास्थानमा गया;

10 अनी दखा, तठे वाळेल हातना एक माणुस व्हता; तवय त्यासनी त्याले दोष लागाले पाहिजे म्हणीसन परूशीसनी त्याले ईचारं, शब्बाथ दिनले रोग बरं करनं योग्य शे का?

11 येशुनी त्यासले सांगं, तुमनामा असा कोण माणुस शे की, ज्यानं एकच मेंढरू राहिसन ते शब्बाथ दिनले खड्डामा पडनं तर त्याले उचलीन बाहेर काढावु नही का?

12 तर मेंढरसपेक्षा माणुसनं मोल कितलं तरी बरच मोठं शे! यामुये शब्बाथ दिनले एखादाले मदत करनं योग्य शे.

13 मंग त्यानी त्या वाळेल हातना माणुसले सांगं, तुना हात सरळ कर, तवय त्यानी हात सरळ करा अनी तो बरा व्हईन दुसरा हातना मायक व्हयना.

14 त्यानंतर परूशीसनी बाहेर जाईसन त्याना विरोधमा योजना आखी की, त्याना घात कशा कराना.

15 पण हाई वळखीन येशु तठेन निंघी गया, तवय बराच लोके त्यानामांगे गयात अनं त्यानी त्या सर्वासले बरं करं;

16 अनी त्यासले बजाईन सांगं, की, माले प्रकट करू नका;

17 याकरता की, यशया संदेष्टानाद्वारा जे सांगामा येल व्हतं ते पुरं व्हई; ते असं की,

18 दखा, हाऊ मना सेवक याले मी निवाडेल शे, तो माले परमप्रिय शे; त्यानावर मी संतुष्ट शे; त्यानावर मी आपला आत्मा घालसु, अनं तो गैरयहूदीसना न्याय करी.

19 तो भांडावु नही अनं वरडावु नही, अनी कोणलेच त्याना आवाज रस्तामा ऐकु येवाव नही.

20 तो अशक्तसले मोडावु नही, अनं धाकला मधला दिवाले तो वलाडावु नही, जोपावत तो न्यायले विजयी करस नही.

21 अनी गैरयहूदीमाधला सर्वा लोके त्याना नावनी आशा धरतीन

22 मंग त्यासनी एक भूत लागेल माणुसले येशुकडे आनं, हाऊ माणुस आंधया अनं मुका व्हता अनी त्यानी त्याले बरं करं, अनी तो मुका बोलाले अनी दखाले लागना.

23 तवय सर्वा लोके नवल करीसन सांगु लागनात, की, हाऊ दावीदना पोऱ्या व्हई का?

24 पण परूशी हाई ऐकीसन सांगु लागनात, हाऊ ते भूतसना राजा बालजबूल यानी मदत लिसन भूत काढस.

25 येशुनी त्यासना मनमधला ईचार वळखीन त्यासले सांगं, आपसमा फुट पडेल प्रत्येक राज्य नष्ट व्हई जास, अनी ज्या शहरमा अनी घरना लोकसमा आपसमा फुट पडनी तर ते शहर अनी घर टिकु शकस नही.

26 सैतानच जर सैतानले काढाले लागना तर त्यासनामा फुट पडी जाई मंग त्यानं राज्य कसं टिकी.

27 जर मी भूतसना राजा बालजबूल यानी मदत लिसन भूत काढत व्हसू तर तुमना लोके कोणी मदत लिसन काढतस? म्हणीन त्याच तुमना न्याय करतीन;

28 पण, मी जर देवना आत्माघाई, भूत काढी ऱ्हायनु तर देवनं राज्य तुमनावर येल शे.

29 तसच पहीलवान माणुसले अगोदर बांधाशिवाय त्याना घरमा घुशीसन त्याना वस्तु लुटीसन कोणले नेता ई का? त्याले बांध तरच तो त्यानं घर लुटू शकस.

30 जो मनासंगे नही तो मनाविरूध्द शे, अनी जो मनाबरोबर गोया करस नही तर तो उधळी टाकस.

31 यामूये मी तूमले सांगस, की माणुसना प्रत्येक पाप अनी निंदानी क्षमा व्हई. पण जो कोणी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी क्षमा व्हवाव नही.

32 अनी जो कोणी मनुष्यना पोऱ्याविरूध्द काही बोली तर त्याना अपराधनी क्षमा व्हई जाई, पण जो कोणी पवित्र आत्माना विरोधमा बोली त्याले त्याना अपराधसनी क्षमा ह्या युगमा बी नही. अनी येनारा युगमा बी व्हवाव नही.

33 यामुये झाड बी चांगलं अनी त्यानं फळ बी चांगलं शे असा म्हणा; नहीतर झाड वाईट शे अनी त्याना फळ बी वाईट; कारण झाड आपले फळवरतीन वळखाई जास.

34 अहो सापना पिल्लासवन, तुम्हीन वाईट ऱ्हाईसन तुमले चांगल्या गोष्टी कशा बोलता येतीन? कारण जे मनमा भरेल शे तेच तोंडमाईन निंघी.

35 चांगला माणुस आपला भांडामाईन चांगल्या गोष्टी काढस, अनी वाईट माणुस आपले भांडामाईन वाईट गोष्टी काढस.

36 मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी.

37 कारण आपला बोलनावर तु निर्दोष ठरशी अनी आपलाच बोलनावर तु दोषी ठरशी.

38 तवय शास्त्री अनं परूशी यासनापाईन काहीजण त्याले बोलनात, गुरजी, तुमना हातघाई काही चिन्ह दखानी आमनी ईच्छा शे.

39 पण त्यानी त्यासले उत्तर दिधं, हाई दुष्ट अनी व्यभिचारी पिढी चिन्ह मांगस, पण योना संदेष्टाना चिन्हशिवाय तिले दुसरं कोणतच चिन्ह देवामा येवाव नही.

40 कारण जस योना तीन दिन अनं तीन रात मासाना पोटमा व्हता, तसाच मनुष्यना पोऱ्या बी तीन दिन तीन रात पृथ्वीना पोटमा ऱ्हाई.

41 न्यायना दिनले निनवेना लोके हाई पिढीना लोकससंगे उभा ऱ्हाईसन हिले दोषी ठरावतीन, कारण त्यासनी योनाना संदेश ऐकीसन पश्चाताप करा; अनी दखा, आठे जो शे तो योनापेक्षा श्रेष्ठ शे.

42 न्यायना दिनले दक्षिणकडनी राणी, हाई पिढीना लोकेसंगे उभी ऱ्हाईन हिले दोषी ठराई, कारण ती शलमोन राजानं ज्ञान ऐकाकरता पृथ्वीना सीमापाईन वनी; अनी दखा, शलमोनपेक्षा श्रेष्ठ आठे शे.

43 जवय दुष्ट आत्मा कोणा माणुस माईन निंघस, तवय तो आराम कराकरता ओसाड जागामा भटकत फिरस, पण त्याले जागा मिळस नही,

44 तवय तो सांगस, ज्या घरमाईन मी येल व्हतु त्यामा परत जासु; अनी जवय तो तठे वापस जास, तवय त्याले ते घर रिकामं साफसफाई करेल, सजाडेल अस दखास.

45 मंग तो जाईसन आपलापेक्षा दुष्ट, असा दुसरा सात आत्मा आपलासंगे लई येस, अनी त्या मजार जाईन तठे ऱ्हातस; मंग त्या माणुसनी शेवटनी अवस्था पहिलापेक्षा जास्त वाईट व्हस; तसच हाई पिढीनं बी व्हई.

46 मंग येशु लोकसनी गर्दीसंगे बोली ऱ्हाईंता, दखा, त्यानी माय अनं त्याना भाऊ त्यानासंगे बोलाकरता बाहेर उभा ऱ्हायेल व्हतात.

47 तवय कोणी तरी येशुले सांगं, दख, तुनी माय अनं तुना भाऊ तुनासंगे बोलाकरता बाहेर उभा ऱ्हायेल शेतस.

48 पण येशुनी त्या सांगणाराले उत्तर दिधं, कोण मनी माय अनं कोण मना भाऊ?

49 अनी येशु आपला शिष्यसकडे हात दखाडीन बोलना, “दखा, मनी माय अनं मना भाऊ!

50 कारण जो कोणी मना स्वर्गना बापना ईच्छाप्रमाणे करस तोच मना भाऊ, बहिण, अनं माय शे.”

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate